Tuesday, 15 November 2016

तू असताना,


तू असताना,
डोळ्यात डोळे घालून बघणं राहूनच गेलं...
एकटक बसून तुला बघणं राहूनच गेलं...

तू असताना,
माझ्या मनातलं सर्व काही सांगणं राहूनच गेलं...
तू माझी असताना सुद्धा तुझ्यावर हक्क दाखवणं राहूनच गेलं...

तू असताना,
तुझा हातात हात घेऊन 'तू माझी आहेस' हे सांगणं राहूनच गेलं...
तुला मिठीत घेऊन आपल्यातलं अंतर कमी करण राहूनच गेलं...

खरच माझं किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगणं मात्र एका दिवसाने राहूनच गेलं... :(

#LostEverythng :(

No comments:

Post a Comment