आज परत एकदा तुला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगावंसं वाटतय...
तुझा हात परत माझ्या हातात घेऊन, थोड चालावस वाटतय...
अन परत एकदा तुला बघावस वाटतय...
आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावसं वाटतय,
अन आपलं कोणीच नाही, म्हणून आरश्या
समोर बसून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा, तुझ्याच आठवणींत जगावस वाटतय...
फक्त तुझ्याच आठवणींत जगावस वाटतय...
#DinkuMinku
No comments:
Post a Comment