Thursday, 24 November 2016

Tuesday, 22 November 2016

आयुष्य जगण्याची खरी मजा तर,

आयुष्य तर आपण सगळेच जगत असतो...
पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर,
आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जगण्यात असते...

#DinkuMinku #Uvul2

Monday, 21 November 2016

वाढदिवसाच्या प्रेमशुभेच्छा :)

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य

"मी तुला विसरणं कधीच नाही शक्य"

---वाढदिवसाच्या प्रेमशुभेच्छा :)

#DinkuMinku  #Uvul2

Sunday, 20 November 2016

फक्त तुझ्याच आठवणींत जगावस वाटतय...

आज परत एकदा तुला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगावंसं  वाटतय...

तुझा हात परत माझ्या हातात घेऊन, थोड चालावस वाटतय...
अन परत एकदा तुला  बघावस वाटतय...

आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावसं वाटतय,
अन आपलं कोणीच नाही, म्हणून आरश्या
समोर बसून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...

आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा, तुझ्याच  आठवणींत जगावस वाटतय...
फक्त तुझ्याच आठवणींत जगावस वाटतय...

#DinkuMinku