Tu Samjun Ka Ghet Nahis
तू समजुन का घेत नाही...
कसं गं तुला काही समजत नाही !
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
तुझ्याशिवाय मला करमत नाही !
तू दुर असलीस की कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !
कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!
तू हे समजुन का घेत नाही.
No comments:
Post a Comment