Friday, 11 November 2016

Tuzya Prema-Sathi Kahi Pan...



एकदा तरी मनापासून विचारायला हवी होतीस
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून
मी उत्तर दिल असत
माझ्या जीवनात तुझ्या सारख्या गोड व्यक्तीचा प्रवेश व्हावा म्हणून

एकदा तरी मनापासून विचारायला हवी होतीस
माझ्या सोबत इतका मोकळा का राहतोस
मी उत्तर दिल असत
मला दुसरी जवळची कोणी नाही म्हणून

एकदा तरी मनापासून विचारायला हवी होतीस
माझ्यात तू इतका का सामील होतोस
मी उत्तर दिल असत
तुझं सुख तेच माझं सुख आहे म्हणून

एकदा तरी मनापासून विचारायला हवी होतीस
तू माझ्यासाठी इतकं सार का करतोस
मी उत्तर दिल असत
मी तुझ्यावर प्रेम केलंय , आणि तुझ्या प्रेमासाठी काही पण


No comments:

Post a Comment